December 1, 2021

Vishwakarma University – Center of Communication for Development

An Initiative of Department of Journalism and Mass Communication, Vishwakarma University, Pune

Empowerment Story Competition organised in December 2020-Top 10 Stories

कोरोनासोबत डॉक्टरांचा लढा…

By  फातिमा इस्माईल इनामदार

सर्वत्र कोरोनाची महामारी पसरली असता आपल्या काही सुपरहिरोंनी खूप चांगले काम केले. तसेच सांगली जिल्ह्यात असणार्‍या शिराळा तालुक्यातील डॉ. नितीन जाधव व त्यांच्या सहकारी कर्मचार्‍यांनी खूप मोलाचे काम केले.

आपल्या देशात विविध प्रकारच्या देवांना मानले जाते, त्याच बरोबर डॉक्टरांनाही लोक दुसरा देव म्हणतात. 2020 हे वर्ष पूर्णपणे कठीण परिस्थितींनी भरलेले आहे. तरीही डॉक्टरांनी या महामारीच्या विरोधात चांगल्याच प्रकारे लढा दिला.

डॉ. नितीन जाधव यांचे वय 52 वर्ष. त्यांनी एम. बी. मेडिसिन असे शिक्षण घेतले आहे. तसेच आनंद नावाचे त्यांचे स्वतःचे हॉस्पिटल आहे. त्यांच्या कुटुंबामध्ये दोन मुली व त्यांची पत्नी असे एकूण चार सदस्य आहेत. कोरोनाच्या या महामारीमध्ये त्यांनाही सामान्य लोकांप्रमाणे सुरवातीला भीती वाटली. पण नंतर जागतिक संशोधन, तसेच इतर बाजू समजल्या. त्याचबरोबर त्यांचे शिराळा तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयामध्ये सरकारतर्फे पोस्टिंग झाल्याने कोरोना रुग्णांसाठी काम केल्यानंतर माझी भीती निघून गेली, असे डॉ. नितीन जाधव म्हणतात.

  कोरोना रुग्णालयामध्ये काम करण्यासोबत ते त्यांच्या दवाखान्यामध्ये देखील काम करत. दिवसाच्या 24 तासांपैकी 14 तास ते काम करत. कोरोना रुग्णांचा उपचार करत असताना त्यांना पी.पी. किट, तसेच लागणारी सर्व औषधे, डॉक्टरांची वेळोवेळी तपासणी, त्याचबरोबर विविध टेस्ट घेण्यासाठी लागणार्‍या मशीन सरकार वेळोवेळी पाठवत आहे. या सर्व महामारीत सरकारने काही चांगले निर्णय घेतले, असे डॉ. जाधव म्हणतात.

बाधितांचा उपचार करताना मुख्यतः ब्लड टेस्ट करत. त्याचबरोबर ब्लड शुगर, किडणी फंक्शन्स, सीआरपी, एलडीएच , रॅपिड ऍन्टीजन व आर.टी.पी. सी आर या मुख्य प्रमाणावर घेतल्या जाणार्‍या टेस्ट आहेत. या रुग्णालयात त्यांच्या सोबत काही एम बी बी एस, बी एच इतर स्टाफ हे सर्व सहकारी होते. या रुग्णालयात त्यांनी 800 रुग्णांचा उपचार केला. त्यापैकी 95 ते 96% कोरोनापिडीत रुग्ण बरे झाले.

  आपल्याला साधारण पणे सर्दी,खोकला, ताप हे होताच असतो.पण यासोबत अंग दुखणे, दम लागणे, तोंडाची चव जाणे,कोणताही सुगंध ओळखता न येणे, पचन प्रक्रिया बिघडणे ही सर्व लक्षणे आढळल्यास तो कोरोना आहे हे स्पष्ट होते.


  सरकारने कोरोनाचा उपचार करण्यास सोपे जावे व रुग्ण लवकर बरा व्हावा म्हणून एक प्रोटोकॉल तयार केला आहे. माईल्ड केसेस, मॉडर्न केसेस व सिरियस केसेस हे विभाग बनवले आहेत. माईल्ड केसेस मध्ये रुग्णांना औषधे, व्हिटॅमिन झिंकच्या गोळ्या दिल्या जात. मॉडर्न केसेस मध्ये रुग्णांना इंजेक्शन दिले जात. तसेच सिरीयर केसेस मध्ये रुग्णाला सलाईन लावणे व इतर उपचार केले जात. यानंतर रुग्णांना होम क्वारंटाइन करुन रुग्णालयामार्फत औषधे पोहोचवण्यात आली.

डॉ. नितीन जाधव सहकारी कर्मचाऱ्यांसोबत कोरोना रुग्णांचा उपचार करताना.

कोरोना होऊन गेल्यानंतर त्या रुग्णाला पुन्हा कोरोना होण्याची शक्यता खूप क्षुल्लक प्रमाणावर असते. सहसा कोरोना पुन्हा होत नाही. अलिकडे कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. सध्या कोरोना वाढण्याची संभावना खूप कमी आहे असे डॉ. जाधव यांचे म्हणने आहे.
  कोरोना वाढू नये म्हणून लोकांनी शारीरिक अंतर पाळणे, मास्क व्यवस्थित लावणे, गर्दी न करणे, सॅनिटायझरचा वापर करणे असे काही स्वतःहून नियम पाळायला हवेत, असे डॉ. जाधव म्हणतात. लोक काही पथ्य पाळत नाहीत, खोकताना, शिंकताना काळजी घेत नाहीत, याची डॉ. नितीन जाधव यांना खंत वाटते.
हे सामाजिक कार्य करून, या कोरोना रूग्णांना बरे करून मोठ्या प्रमाणावर मनाची शांती लाभली. ‘जनसेवा हीच ईश्वरसेवा’, असे डॉ. नितीन जाधव मानतात.

No of words- 451

Fatima Inamdar

BA Journalism & Mass Communication Second Year (4th semester)
Vishwakarma University Centre of Communication for Development, Pune