January 22, 2025

Vishwakarma University – Centre of Communication for Development

An Initiative of Department of Journalism and Mass Communication, Vishwakarma University, Pune

Miscellaneous

डॉ किरण ठाकूर  पुणे, विश्वकर्मा विद्यापीठ विकास वार्ता केंद्र (वि वि वि वार्ता केंद्र) सुमारे चार दशका पूर्वी भारतावर आलेले मोठे संकट दूर होत आल्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत. काँग्रेस गवत किंवा गाजर गवत अशा नावाने आलेलं हे  संकट दूर करण्यासाठी उपयोगी ठरतो  आहे एक सहा मिमी लांबीचा क्षुद्र आणि निरुपद्रवी वाटणारा मूळचा मेक्सिकोचा भुंगा! आपल्यावर मोठे उपकार करणाऱ्या या कीटकांची माहिती करून घेण्यापूर्वी हे काँग्रेस गवत आणि त्याच्यामुळे आलेले संकट या विषयी जाणून घेऊ या. या तणाचे वनस्पती शास्त्रीय लॅटिन नाव .पार्थेनियम हिस्टेरिफोरस ( (Parthenium hysterophorus) असे आहे. काँग्रेस गवत खाल्यामुळे  गुरांच्या दुधाला कडवट चव येत असे. ्यंत वाढणारे हे गवत चवीने फारच कडवट असते .  लहान बालकांना अशा दुधाच्या सेवनामुळे इतर आजार होण्याची  धास्ती होती. या तणाचा देशातल्या शेतीला देखील  मोठा धोका निर्माण झाला. सुमारे साडे तीन कोटी हेक्टर  क्षेत्रावर या  गवताने आक्रमण केल्याने त्यावरची पिके  नष्ट होऊ लागली होती . भारतात आणि भारताबाहेर इंग्रजी वर्तमानपत्रानी तर या तणाला भयकारक नावं दिली होती. Scourge of India (भारतावर आलेलं अरिष्ट) हे  त्यातलं एक. वर्ष १९८४ मध्ये हॉलिवूड चा ‘टर्मिनेटर’ या नावाचा चित्रपट जगभर गाजला होता. मानव वंशाचा संहारच्या करू पाहणाऱ्यांचा   निप्पात करणाऱ्या नायकाची ही कथा होती. विज्ञान कल्पित   (Science fiction सायन्स फिक्शन ) असं स्वरूप असलेल्या या चित्रपटाचे नंतर आतापर्यंत सहा भाग (सिक्वील) निघाले....