November 14, 2024

Vishwakarma University – Centre of Communication for Development

An Initiative of Department of Journalism and Mass Communication, Vishwakarma University, Pune

Beyond the Five Ws and One H : Story of A Good Samaritan

Sheetal Akhade,TY-JMC,Vishwakarma University,Pune

What happens if a 14-year-old deaf and dumb girl is crushed to death because she could not hear the whistle of the speeding train? Within the same instant, an Ammunition Factory worker is
knocked down trying unsuccessfully to save the girl from the jaws of death, on 15 th January 1990.
The two simultaneous deaths were witnessed by scores of onlookers waiting at the Wakadewadi railway crossing in Pune’s Shivajinagar. Nothing would have normally happened except for a
two-paragraph news story in local newspapers. The two persons unknown to each other were nearly destined to remain confined to a drab police press note, not seeing the light of even a
snippet in a Pune newspaper.

Destiny had, however, planned something different for the worker’s family. The police press note was handled by a reporter of Loksatta, a Marathi daily belonging to the Indian Express group of newspapers. He spent time and energy to investigate the why and the who of the tragedy. It was not a case of a love-lorn couple as the onlookers and even the police thought initially.

It was a great sacrifice of a human being for an unknown girl whose fault was that she could not hear the train whistle. She attempted to cross a railway track like hundreds others used to do every day on any given day earlier and later.

The young reporter, Sunil Kaduskar (then 32 years old), did some legwork for a couple of days. He found out that the girl (Sujata Shankar Dhiwar) was on her way home from school. Kisan Kadam was 35 year-old Ammunition Factory worker who jumped to save her, without thinking about his own life and the fate of his family members.
For Sunil, it eventually turned out to be a story beyond the Five Ws, and One H: Who, What, where, when, why and H, the basics his journalism teacher had taught him in the media class.

Writing a news story for Loksatta that evening,  he began thinking about Kisan Kadam’s sacrifice. Why did he have to do it? What would now happen to his family? His widow was a housemaid earning only a pittance every month. She now had to look after three kids and a handicapped brother. She would not afford even a ramshackle hut in a Wakadewadi slum .  

Mr.Sunil Kaduskar

Writing a news story for Loksatta that evening,  he began thinking about Kisan Kadam’s sacrifice. Why did he have to do it? What would now happen to his family? His widow was a housemaid earning only a pittance every month. She now had to look after three kids and a handicapped brother. She would not afford even a ramshackle hut in a Wakadewadi slum .  

Kaduskar discussed the situation with Resident Editor Anil Takalkar and Chief Editor Madhav Gadkari. He pleaded with them that Kisan’s was a supreme sacrifice on par with that of soldiers who lay down their lives on the battlefield. 

Gadkari was a sensitive editor with a track record of taking up causes of the deserving downtrodden. He wrote a touching article in his weekly column ‘Chaufer’ urging the readers to help widow Vaijayanta, her two daughter, a son, and a handicapped brother. The family lived in the eight by eight hut in the slum along the train track. It would not afford even that space that now. Gadkari did not stop at making a mere newspaper appeal. He set up a fund-raising committee under his chairmanship and Kaduskar and Takalkar as the members. Indian Express Group Chairman and Managing Director Vivek Goenka initiated the drive with a donation of Rs. 25,000.00. Readers contributed spontaneously. Soon, the committee made an announcement in Loksatta columns that it would close the drive when the fund reached Rs 89,000.00. The same day an inmate of  an Old-age Home (Mrs Meera Gogate) rushed to the Loksatta office with a cheque of Rs. 11,000. She wanted the fund to reach a round figure of Rs One Lakh. She had experienced the grief of widowhood and wanted to help Vaijayanta during her critical period. 

The overwhelming response from the newspaper drive and its readers prompted the factory management to give Vaijayantabai a class-four menial job on compassionate ground and provide her servants quarters. The management, took up the responsibility of education expenses of the children.

This was possible because of the support of by the committee and the Loksatta team including the then General Manager, Mr George Varghese, now Chief Executive officer,  The committee evolved a plan to disburse the fund judiciously to meet the needs of the family. Kaduskar came across Good Samaritans at every stage of his involvement with the family.

Loksatta, Editorial column

The committee invested Rs one lakh in a nationalised bank-run trusteeship company. The fund in the account grew to Rs eight lakhs in the course of the time. The committee helped the family invest in booking a flat which was ready recently. Expenses for the children’s weddings were available on time. Vaijayantabais family responsibilities were thus over before she is scheduled to retire in February 2022. 

Sunil Kaduskar is now a 63-year- old retired journalist. In his career, he must have covered scores of interesting and challenging journalistic assignments. Yet for him, Kisan’s was the most satisfying one that he would undoubtedly remember the rest of his life.

News feature authored by:

Sheetal Akhade

BA Third Year (Journalism & Mass Communication)
Vishwakarma University, Pune
Email: sheetalakhade20@gmail.com 


This case study was conceptualised and edited by
Dr Kiran Thakur

Professor Emeritus

Director

VU Centre of Communication for Development 

Department of Journalism and Mass Communication

Phone: + 91 20 25650225, mobile + 91 9373331733

Emails:

kiran.thakur@vupune.ac.in,

drkiranthakur@gmail.com



Acknowledgement

This case study could not have been possible without the help from Mr Sunil Kaduskar.
kaduskar.sunil@gmail.com

योद्धा पत्रकारः खडी कर दी मानवता की मिसाल सुनील कडुस्कर की साहसिक पत्रकारिता

फातिमा इस्माईल इनामदार, बी.ए. थर्ड इयर जर्नालिज्म एंड मास कम्यूनिकेशन
विश्वकर्मा विश्वविद्यालय. पुणे 

पुणे: मशहूर कवि सर्वेश्वर दयाल सक्सेना ने बरसो पहले अपनी एक कविता में लिखा था, ‘इस दुनिया में आदमी की जान से बडा कुछ भी नही हैं…’ इतने बरसों बाद इन बातों को हमने सच में बदलते देखा है, वो भी पुणे की जमीन पर. यहां के एक होनहार एवं जांबाज पत्रकार सुनील कडुस्कर, जो मराठी के सबसे मशहूर अखबार लोकसत्ता के साथ कई सालों तक बतौर जर्नलिस्ट की हैसियत से काम कर रहे थे.

उन्होंंने अपनी कलम के चलते एक ऐसी मानवता की मिसाल खडी कर दी. बहादुरी से अपने काम को अंजाम देनेवाली पत्रकारिता की न भुला पाने वाली एक मिसाल बन गई है. यकीनन उनकी साहसिक पत्रकारिता का यह एक पैगाम है. पत्रकारों को अपने सैनिकों की तरह ही एक योदधा माना जाना चाहिए. लोकसत्ता ने इस अनुभव की खबर देकर एक वस्तु पाठ तैयार किया कि कैसे पत्रकारिता के माध्यम से मानविय रचनात्मक एवं सृजनात्मक कार्य किया जा सकता है.

गौरतलब है कि १५ जनवरी १९९० में पुणे के शिवाजीनगरस्थित रेलवे क्रॉसिंग पर ट्रेन दुर्घटना में एक १४ वर्षीय गुंगी-बहरी लडकी (सुजाता शंकर धीवर) और उसे बचाने के लिए अपनी जान जोखिम में डालनेवाले ३५ वर्षीय (किसन तुकाराम कदम ) इन दोनों की मौत हो गई. शाम के समय घटी घटना के समय रेलवे क्रासिंग के पास काफी भीड होने के बावजूद किसी भी व्यक्ति ने यह हिम्मत नही दिखाई की, रेल पटरी पार करनेवाली सुजाता को बचाया जाए. उसी समय अपनी जान जोखिम में डालते हुए किसन कदम ने उसे बचाने की कोशिश की, लेकिन इस घटना में दोनों को अपनी जान गंवानी पडी.

इस खबर को प्रकाशित करनेवाले लोकसत्ता के संवाददाता सुनील कडुस्कर विभीन्न सवालों से घिरे हुए थे. जैसे कि यह दोनों कौन होंगे? उनका आपस में क्या संबंध होगा? दुर्घटना की यह खबर देने के बाद उनके परिवार का क्या होगा ? आदि. पत्रकारिता के पेशे में कार्य करते समय दयालु होना और मानविय मूल्यों का ख्याल रखना चाहिए. इसी बात को ध्यान में रखते हुए कडुस्कर की संवेदनशीलता और लोगों के सुख दुख का विश्वास जाग उठा. खोजबीन के दौरान पता चला कि मृतक किसन कदम एक गोला बारूद फैक्टी का कर्मी था. वाकडेवाडी के झुग्गी बस्ती में आठ बटा आठ के एक छोटे से कमरे में पत्नी, दो बेटियां, एक बेटा और एक अपाहिज भाई रहता है. वहीं दूसरे के घर बर्तन मांझकर मृतक की पत्नी वैजयंता अपने परिवार में हाथ बटां रही थी.

Mr.Sunil Kaduskar

कर्ता पुरूष चले जाने से तबाह हुए पूरे परिवार की स्थिति को जानते हुए कडुस्कर ने निवासी संपादक अनिल टाकलकर से आग्रह किया कि इस परिवार को फिर शारीरिक एवं मानसिक रूप से खडा करेंगे. उसके बाद दोनों ने प्रधान संपादक माधव गडकरी से संपर्क साधा. दयालु, संवेदनशील और मानवीय संपादक गडकरी ने किसन की बहादुरी को महसूस किया. उन्होंने सोचा कि करीबी रिश्तेदार न होने के बावजूद मानवता की भावना से एक अजनबी की जान बचाने की कोशिश करना, समाज को प्रेरित करने और इस तरह के बलिदान करनेवाले व्यक्ति के परिवार को सक्रिय रुप से समर्थन करना चाहिए. यह उन लोगों के लिए आश्वस्त करनेवाला होगा जो ऐसा करने का साहस करते है. उन्हें विश्वास था कि यह शहादत एक सैनिक के बलिदान के समान महत्वपूर्ण है. इस बात को उन्होंने अपने कॉलम “चौफेर” के माध्यम से प्रभावी ढंग से रखते हुए किसन कदम को मदत निधि योजना की घोषणा की. साथ ही इंडियन एक्सप्रेस ग्रुप के  विवेक गोयनका को इस विचार से अवगत कराया. पश्चात समूह की ओर से २५ हजार रुपये के अनुदान की घोषणा की.

इस कॉलम को जबरदस्त प्रतिक्रिया मिलने पर बारह दिनों के भीतर ८८ हजार रुपये से अधिक का फंड जमा हुआ. हालांकि वर्तमान में यह रकम छोटी है लेकिन ३० साल पहले ज्यादा थी. निधि संकलन पर रोक लगाने की घोषणा के बाद उसी दिन एक वरिष्ठ महिला लोकसत्ता कार्यालय में ११ हजार रुपये का चेक लेकर आई और नाम बताए बिना घर लौट गई. अब यह सवाल उठा कि इतना बडा दान देनेवाली महिला कौन है.  उनकी तलाश शुरू होने पर पता चला कि पति के मृत्यु के बाद वह महिला श्रीमती मीरा गोगटे पुणे के एक वृद्धाश्रम में ठहरी है. पश्चात कडुस्कर अपनी पत्नी नीलम के साथ उनसे मिलने गए. मैने इतनी बडी रकम देने के पीछे का कारण जानने की कोशिश करने पर उन्होंने कहा, 

मैंने अनुभव किया है कि विधवापन कितना दर्दनाक और कठिन होता है. इसलिए फैसला लिया कि मुझे वास्तव में यह करने की जरूरत है. साथ ही एक लाख रुपय के लिए ११ से १२ हजार रुपए कम थे इसलिए मैंने यह चेक सौपा.

इस परिवार का जिम्मा उठाने पर लोकसत्ता ने गोला बारुद फैक्ट्री के महाप्रबंधक एस.ए. नटराजन से संपर्क साधकर कदम की पत्नी वैजयंता को अनुकंपा के आधार पर नौकरी देने का अनुरोध किया गया. नटराजन ने कदम की मृत्यु के तीन हफ्ते बाद ही वैजयंता को आया के रुप में नियुक्त किया. एम्युनिशन फैक्ट्री में बच्चें की पढाई का खर्चा भी उठाया. नतीजतन परिवार का आर्थिक बोझ बहुत कम हो गया था. कुछ ही दिनों में उसे क्वार्टर में रहने की व्यवस्था की गई.

जमा राशि को परिवार की जरूरतो को पूरा करने के लिए बैंक ऑफ महाराष्ट्र की ट्रस्टी कंपनी में स्थानांतरित कर इसका ट्रस्ट फंड बनाया गया. इस प्रक्रिया में गडकरी, टाकलकर और कडुस्कर ट्रस्टी थे. जब बच्चे बडे हो जाएंगे, तो उनमें से प्रत्येक को २५ प्रतिशत धन मिलेगा और इसका इस्तेमाल उच्च शिक्षा के लिए हो. कुछ साल बाद एक लाख की राशि ८ से ९ लाख रूपए हुई. इसमें से २५ प्रतिशत राशि का उपयोग सबसे बडी बेटी (सुषमा) की शादी के लिए, दूसरी लडकी (रेशमा) की नर्सिंग शिक्षा के लिए २५ प्रतिशत और तीसरा बच्चा (दीपक) दसवीं तक पढा था बाद में उसकी शादी के लिए २५ फीसदी का भुगतान किया गया.

३२ साल तक फैक्ट्री में काम करनेवाली वैजयंता फरवरी में सेवानिवृत्त होगी. इसलिए वह अपने परिवार के साथ दिघी के घर में चली गई है. कडुस्कर ने घर के अधिग्रहण के लिए बिल्डर से बातचीत की. कम लागत पर अतिरिक्त रियायतें प्राप्त करने के लिए शेष राशि का इस्तेमाल करने के लिए कहा गया.

पत्रकारिता में एक मानवीय संवेदनशील पत्रकार होना. पत्रकारिता के प्रतीकात्मक ढांचे से परे जाते हुए एक परिवार के लिए सशक्त सहारा बनाना असामान्य बात नहीं है. कदम के बलिदान और बहादुरी को पैसाेंं से मापा नहीं जा सकता है. हालांकि, यह निश्चित रुप से काबिले तारीफ है कि उन्होंने अपने बाद परिवार को आर्थिक और मनोवैज्ञानिक सहयोग देकर एक बडे संकट से निकलने में मदद की. इस घटना ने एक सुखद प्रतिक्रिया भी दी है कि कैसे समाज मानवता के लिए अच्छे काम करने वाले परिवार के पीछे मजबूती से खडा रहता है.

 

पत्रकारिता का असली गौरव

उस समय सुनील कडुस्कर ३२ साल के थे. उनका १९९२ में इंडस्ट्रियल कम्युनिकेटर्स द्वारा संवाददाता विशेष सम्मान किया गया था. यही उनकी पत्रकारिता का असली गौरव है. इस पुरस्कार ने उन्हें पत्रकारिता में उनके काम का पक्ष लिया है. ६३ वर्षीय कडुस्कर पत्रकारिता में विभिन्न जिम्मेदारियों से सेवानिवृत्त हुए है. कई समाचार और अपनी कलम से समाज को न्याय दिलाने का प्रयास करनेवाले कडुस्कर को आज भी किसन कदम के दुर्घटना की असाइनमेंट का विवरण याद है.

लेखक छात्रा:: फातिमा इस्माईल इनामदार.

बीए. थर्ड इयर जर्नालिज्म एंड मास कम्यूनिकेशन
विश्वकर्मा विश्वविद्यालय. पुणे  411048
Email- fatimainamdar05@gmail.com

इस फीचर के लिए अतिथि संपादक:

श्री संजय बी कैकाड़े
मीडिया रिलेशन ऑफिसर, जनसंपर्क विभाग,
एम् आई टी वल्डपीस यूनिवर्सिटी
कोथरुड पुणे ४११०२९ 

This case study was conceptualised by
Dr Kiran Thakur

Professor Emeritus

Director

VU Centre of Communication for Development 

Department of Journalism and Mass Communication

Phone: + 91 20 25650225, mobile + 91 9373331733

Emails:

kiran.thakur@vupune.ac.in,

drkiranthakur@gmail.com

Acknowledgement:

This case study could not have been possible without the help from Mr Sunil Kaduskar.
kaduskar.sunil@gmail.com

पत्रकारितेच्या साचेबंद चौकटीच्या पलीकडे...

प्रतीक्षा जाधव

युद्धभूमीवर हौतात्म्य प्राप्त झालेल्या सैनिकाच्या असीम त्यागाबद्दल जनमानसात आदराची भावना असणे स्वाभाविक आहे. परंतु केवळ युद्धभूमीवरच नव्हे तर आयुष्याच्या रोजच्या जगण्याच्या लढाईत काही असामान्य माणसे जिवाची बाजी लावून अनोळख्या व्यक्तींसाठी देखील हौतात्म्य पत्करतात. अशांचे बलिदान हे युद्धभूमीवरील सैनिकांच्या बलिदानाइतकेच मौलीक असते. माणुसकीच्या नात्यावरील विश्वास त्यामुळे अधिक दृढ होतो. या अनुभवाची प्रचिती देणारी बातमी लोकसत्ताने देऊन पत्रकारितेतून रचनात्मक कार्य कसे उभे करता येते याचा वस्तुपाठ निर्माण केला.

दैनिकामध्ये अपघाताच्या बातम्या येणे हा एक अविभाज्य भाग आहे. तशीच जानेवारी १९९० मधील ही घटना होती. पुण्यातील शिवाजीनगर जवळील वाकडेवाडी रेल्वे क्रॉसिंगवर घडलेल्या या रेल्वे अपघातात रेल्वे रुळ ओलांडणारी १४ वर्षे वयाची कर्ण बधीर मुलगी आणि तिला वाचविण्यासाठी झेपावणारा किसन तुकाराम कदम हा तरुण हे दोघेही मृत्युमुखी पडले. संध्याकाळी झालेल्या या घटनेच्या वेळी रेल्वे क्रॉसिंगवर भरपूर गर्दी होती. गाडी वेगाने येत असतानाही ही मुलगी रूळ ओलांडत होती. इंजिन ड्रायव्हरने इंजिनची शिट्टी वाजवून तिचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पण कानाने ऐकू येत नसल्याने तिच्या ते लक्षातच आले नाही. ही मुलगी गाडीखाली सापडणार याची कल्पना गर्दीतील अनेकांना आली पण धावत जाऊन तिला वाचविण्याचे साहस अन्य कोणालाच करावेसे वाटले नाही. किसन कदम यांनी मात्र अखेरच्या क्षणी आपल्या जिवाची पर्वा न करता या मुलीला वाचविण्यासाठी धाव घेतली. पण त्यात दोघांनाही प्राण गमवावे लागले.

ही बातमी देणारे लोकसत्ताचे वार्ताहर सुनील कडूसकर यांचे वैशिष्ट्य असे की, अपघाताची ही बातमी दिल्यानंतर हे दोघे कोण असतील, परस्परांत त्यांच्यात काय नाते असेल, त्यांच्या परिवाराचे आता काय होईल, अशा विविध प्रश्नांनी त्यांना अस्वस्थ केले. पत्रकारितेचे धडे गिरविताना त्यासाठी आवश्यक असलेल्या अनेक गुणांचा उल्लेख होतो. त्यामध्ये ती व्यक्ती सहृदय, माणुसकीचे मूल्य (गुड ह्युमन बिईंग) जपणारी अशा गुणांची असावी अशी अपेक्षा त्यात व्यक्त होते. कडूसकर यांच्या या बातमीमधून त्यांची संवेदनशीलता आणि माणसांच्या सुखदुःखाविषयी त्यांना वाटणारी आस्था यांची प्रचिती आली.

त्यांनी या बाबत दिलेल्या माहितीनुसार नंतर ते पुन्हा घटना स्थळी गेले. त्यावेळी त्यांना मृत व्यक्तीचे नाव किसन कदम असून ते अॅम्युनिशन फॅक्टरीचे कामगार असल्याचे कळले. किसन कदम यांचे कुटुंब वाकडेवाडी येथील झोपडपट्टीत रहात होते. पत्नी दोन मुली, एक मुलगा व दिव्यांग असा भाऊ असे सर्वजण आठ बाय आठच्या छोट्या खोलीत रहात असल्याचे निदर्शनास आले. कदम यांची पत्नी वैजयंता दुसऱ्याच्या घरी धुणी- भांडी करून आपल्या संसाराला हातभार लावत होत्या.

या कुटुंबातील कर्ता पुरुषच गमावल्याने साऱ्या कुटुंबावर आभाळ कोसळले होते. ही परिस्थिती जाणून घेतल्यावर या कुटुंबाला सावरण्यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे, अशी आग्रही भूमिका त्यांनी आपले वरिष्ठ, लोकसत्ताचे निवासी संपादक अनिल टाकळकर यांच्यापुढे मांडली.

त्यानंतर त्या दोघांनीही लोकसत्ताचे प्रमुख संपादक माधव गडकरी यांच्याशी संपर्क साधला. गडकरी हे सहृदय, संवेदनशील व माणुसकीचे मूल्य जपणारे  संपादक होते. त्यांच्या चौफेर या लोकप्रिय स्तंभामधूल याचे प्रतिबिंब उमटलेले असायचे. किसन कदम यांचे शौर्य त्यांना भावले. आपली जवळची नातेवाईक नसतानाही देखील केवळ माणुसकीच्या भावनेने अनोळखी व्यक्तीला वाचविण्याचा प्रयत्न करणे, हे उदाहरण समाजात प्रेरणादायी ठरेल असे त्यांना वाटले. आणि असे बलिदान करणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबाच्या मागे समाजाने सक्रीय पाठबळ दिले तर त्यामुळे अशा तऱ्हेचे धाडस करणाऱ्यांना ते आश्वस्त करणारे वाटेल. हे हौतात्म्य सैनिकाच्या बलिदानाइतकेच महत्त्वाचे आहे, असे त्यांचे प्रांजळ मत होते आणि चौफेर या आपल्या स्तभांतून त्यांनी ते प्रभावीपणे मांडले. 

याच स्तंभातून त्यांनी किसन कदम मदत निधी या योजनेची घोषणाही केली. इंडियन एक्स्प्रेस समुहाचे सर्वेसर्वा विवेक गोएंका यांना ही कल्पना सांगून या समुहाच्या वतीने २५ हजाराची मदत त्यांनी जाहीर केली. समुहाचे आताचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉर्ज वर्गीस यांनी या मोहिमेची प्रशासकीय जबाबदारी तितक्याच आत्मीयतेने उचलली.

या आवाहनाला मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दहा बारा दिवसांतच या निधीने ८५ ते ८८ हजाराचा टप्पा ओलांडला. आजच्या काळात चलनवाढीमुळे ही रक्कम अल्प वाटत असली तरी ३० वर्षापूर्वी तिचे मूल्य मोठे होते. निधी संकलन एक दोन दिवसांत बंद करणार असल्याचे जाहीर केल्यावर त्याच दिवशी सकाळी एक ज्येष्ठ महिला नागरिक ११ हजाराचा धनादेश घेऊन लोकसत्ताच्या कार्यालयात दाखल झाली. आपला धनादेश सफाई कर्मचाऱ्याच्या हाती देऊन आपले नाव न सांगताच ती घरी परत गेली. एवढी मोठी देणगी देणारी ही महिला कोण, हा प्रश्न पडल्यावर तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. पतीच्या निधनानंतर ही महिला पुण्यातीलच एका वृद्धाश्रमात रहात होती. त्यांना भेटायला कडूसकर व त्यांच्या पत्नी तेथे पोहोचल्या. एवढा मोठा निधी देण्यामागील कारण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्या म्हणाल्या, वैधव्य किती यातनादायी व कठीण असते, हे मी स्वतः अनुभवले आहे. त्यामुळे मी ही मदत करावी, असे मला वाटले. शिवाय एक लाख रुपयांना ११ – १२ हजार रुपये कमी पडतात, म्हणून मी या रकेमेचा धनादेश दिला. कारण हा निधी किमान एक लाखावर व्हावा, अशी माझी इच्छा आहे.

लोकसत्ताने या कुटुंबाचे जणू पालकत्त्वच घेतले होते. म्हणूनच अॅम्युनिशन फॅक्टरीचे सरव्यवस्थापक एस. एस. नटराजन यांच्याशी संपर्क साधून अनुकंपा तत्वावर कदम यांच्या पत्नी वैजयंता यांना नोकरी द्यावी, अशी विनंती लोकसत्तातर्फे करण्यात आली. नटराजन यांनी या प्रकरणी जातीने लक्ष घालून कदम यांच्या मृत्यूनंतर अवघ्या तीन आठवड्यात वैजयंता यांना आया म्हणून नोकरीवर घेतले. त्याचबरोबर मुलांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारीही अॅम्युनिशन फॅक्टरीने उचलली. त्यामुळे कुटुंबाचा आर्थिक भार मोठ्या प्रमाणावर हलका झाला. काही दिवसातच फॅक्टरीच्या क्वॉर्टरमध्ये वैजयंता कदम यांची राहण्याची व्यवस्था झाली.

नंतर निधी संकलनाद्वारे जमा झालेली रक्कम कुटुंबाच्या गरजा भागविण्यासाठी महाराष्ट्र बँकेच्या ट्रस्टी कंपनीकडे जमा करण्यात आली आणि तिचा विश्वस्त निधी तयार करण्यात आला. या प्रक्रीयेत गडकरी, टाकळकर आणि कडूसकर हे विश्वस्त सल्लागार होते. मुले मोठी झाली की, प्रत्येकाच्या वाट्याला २५ टक्के निधी येईल व तो त्याच्या शिक्षणासाठी वापरला जाईल, असे नियोजन कडूसकर यांनी केले. काही वर्षानंतर एक लाख रुपयांच्या रकमेचे ८ ते ९ लाख रुपये झाले. मुलीच्या विवाहासाठी निधीची २५ टक्के रक्कम वापरण्यात आली. दुसऱ्या मुलीने घेतलेल्या नर्सिंग शिक्षणासाठी याच निधीतून मदत मिळाली. तिसऱ्या मुलाने दहावी पर्यंतचे शिक्षण घेतले. नंतर त्याच्या लग्नालाही २५ टक्के रक्कम देण्यात आली.

दरम्यान वैजयंता यांनी तब्बल ३२ वर्षे अॅम्युनिशन फॅक्टरीत नोकरी केली. पुढील वर्षी फेब्रुवारीत त्या निवृत्त होणार आहेत. त्यामुळे त्या दिघी येथे घेतलेल्या नव्या घरात रहायला गेलेल्या आहेत. हे घर घेतानाही निधीतील उर्वरित रकमेचा वापर करण्यात आला. कमी किमतीत वाढीव सवलती मिळाव्यात म्हणून बिल्डरशीही वाटाघाटी करण्याचे काम कडूसकर यांनी केले.

माणुसकीप्रती संवेदनशील असलेला वार्ताहर पत्रकारितेच्या सांकेतिक चौकटीच्या बाहेर जाऊन एखाद्या कुटुंबासाठी किती मोठा आधार ठरू शकतो, असे उदाहरण पत्रकारितेत क्वचितच पहायला मिळते. कदम यांनी केलेल्या त्यागाचे व शौर्याचे मोजमाप पैशामध्ये करता येणार नाही. तरीही त्यांच्या पश्चात त्या कुटुंबाला आर्थिक व मानसिक आधार देऊन एका मोठ्या संकटातून बाहेर काढले. त्यावेळी त्यांचे वय केवळ ३२ होते. आता ते त्रेसष्ट वर्षाचे आहेत. या प्रदीर्घ कालखंडात त्यांनी असंख्य चांगल्या बातम्या लिहिल्या, पण अजूनही त्यान किसन कदम ची कहाणी ठळकपणे आठविते. याचं कारण माणुसकीसाठी चांगल काम करणाऱ्या कुटुंबाच्या मागे  समाज खंबीरपणे कसा उभा राहतो, याचेही सुखद प्रत्यंतर या घटनेने आणून दिले. या कामगिरीबद्दल कडूसकर यांना इंडस्ट्रियल कम्युनिकेटर्सने १९९२ मध्ये पुरस्कार दिला. हा त्यांच्या पत्रकारितेचा सार्थ गौरव म्हणायला हवा. पत्रकारितेत राहून निरपेक्ष भावनेने केलेल्या त्यांच्या या कामावर पसंतीची मोहोरच या पुरस्काराने उमटविली आहे.

प्रतीक्षा जाधव
BA (Journalism & Mass Communication) 

Vishwakarma University, Pune 

 Email: pratiksha283200@gmail.com

 

This case study was conceptualised and edited by
Dr Kiran Thakur

Professor Emeritus

Director

VU Centre of Communication for Development 

Department of Journalism and Mass Communication

Phone: + 91 20 25650225, mobile + 91 9373331733

Emails:

kiran.thakur@vupune.ac.in,

drkiranthakur@gmail.com

Acknowledgement:

This case study could not have been possible without the help from Mr Sunil Kaduskar.
kaduskar.sunil@gmail.com