Lepa,Madhya Pradesh- Covid 19 was a blessing in disguise for the Adivasi children of Nimad region. They could get a good training in areas they did not know earlier such as plumbing, carpentry, vending, dairy farming, stitching and organic farming.
They received the training from the former students of the famed Vigyan Ashram, Pabal, at
Maharashtra’s Pune district who did not have anything to do during that critical period. These
former students are activists of the Nirmar Abhyudaya Rural Management and Development
Association (NARMADA) set by Ms Bharati Thakur.
The NARMADA workers volunteered to take up her proposal to train the tribal boys and
girls at the campus of the Ramkrishna Sarada Niketan at Lepa Punarvas, Bhatyaan and other
places nearby. The outcome of the successful training is now visible. The tribal students
contributed to the construction of school buildings, goshala, rainwater harvesting setup and
toilet blocks.
For the NARMADA, it resulted in substantial savings with this deployment of the Adivasi
youth. For adivasi studentst, it was a lifetime achievement getting trained in electrical,
mechanical, and civil engineering other technical areas. Both the trainers and trainees used
the time for mutual advantage when the schools’ teaching and non-teaching staff had no work
to day. The most adisasi families of the region, including the trainees, had worries to earn
livings for food and glossary. In case of these trainees, the NARMADA offered all this and
also the opportunity to learn cooking.
The NARMADA has been founded by Bharati Thakur, a former central government
employee of Nashik, in Maharashtra, after she completed Narmada Parikrma in year …. She
decided to settle at Lepa Punarvas to set up schools near Mandaleshwar in year ..By last year,
about 1700 students were enrolled until the COVID 19 affected the school complex.
Bharatiji and her small team have continued their activates during the last difficult seven
moths trained the Adivasi in skills that their counterpasts most urban well-to-do could not
dream to do.
https://narmadalaya.org/main/
By Sheetal Akhade (Second Year), Department of Journalism and Mass Communication, Vishwakarma University, Pune.
edited by : Prof. Dr. Kiran Thakur
कोविड काळात आदिवासी विद्यार्थ्याना प्रशिक्षणाचा अनपेक्षित लाभ
शीतल आखाडे
लेपा पुनर्वास, नोव्हेंबर ५, २०२० (वि वि वि वार्ता)
कोविड 19 ने देशात सर्वत्र संकटांची मालिका उभी केली. पण मध्य प्रदेशातील निमाड भागातील काही आदिवासी मुला-मुलींना कोविड चा अनपेक्षित लाभच झाला. या पंचवीस-तीस शालेय विद्यार्थ्याना कौशल्य आणि उपयुक्त अनुभव मिळत आले. आता लॉक डाऊन संपत आला असताना च त्यांना नोकरी-व्यवसायात संधी मिळवण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.
नर्मदा काठी खरगोन जिल्ह्यात लेपा पुनर्वास या खेड्यात या विद्यार्थ्यांनी प्लंबिंग, वेल्डिंग, इलेक्ट्रिकल वायरिंग,सुतार काम, रेन वॉटर हार्वेस्टिंग, गो पालन, शेती, बांधकाम आणि शिलाई आदी कौशल्ये प्राप्त करून घेतली आहेत.
बाहेरच्या जगात फारसे माहीत नसलेल्या या छोट्या खेड्यात ‘नर्मदालय, या संस्थेच्या प्रांगणात त्यांना हे प्रशिक्षण मिळाले.
या संस्थेच्या संस्थापिका आणि विश्वस्त भारती ठाकूर यांनी कोविद च्या काळात संस्थेच्या कार्यकर्त्यांसमोर या आदिवासी मुला मुलीना अशा गोष्टी शिकवू या का अशी कल्पना मांडली. पुणे येथील विज्ञान आश्रमात प्रशिक्षण घेऊन आलेल्या या पाच-सहा कार्यकर्त्यांनी ही कल्पना उचलून धरली.
बाहेच्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या निवास भोजनाची व्यवस्था सुद्धा येथे झाली. नर्मदालयाच्या वसतिगृहात आणि भोजनालयात व्यवस्थापनाचे आणि स्वयंपाकाचे देखील प्रशिक्षण येथे त्यांना आपसूक मिळाले.
नाशिकच्या आर्टिलरी सेंटरला कार्यरत असणाऱ्या श्रीमती भारती यांनी नर्मदा परिक्रमा केल्यानंतर स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली. वर्ष २००५ मध्ये निमाड परिसरात छोटे बाल मंदिर त्यांनी सुरू केले. संस्थेच्या उपक्रमात आता रामकृष्ण सारदा निकेतन, निमाड अभ्युदय ग्रामीण व्यवस्थापन आणि विकास (नर्मदा) आणि अन्य असे उपक्रम मिळून आता १७०० विद्यार्थी शिकतात. विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी अशा सर्वांनाच कोविड मुळे घरी बसण्याची वेळ आली हे लक्षात घेऊन असे कौशल्याधिष्ठित प्रशिक्षण देण्याचा उपक्रम आम्ही हाती घेतला. त्यात खूप यश मिळाले, असे श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.
देशात इतर ठिकाणी सर्वानाच घरी बसण्याची वेळ आली, पण या आदिवासी मुलांना मात्र खूप अनपेक्षित चांगली संधी मिळाली, याचा आम्हाला आनंद वाटतो. असे त्यांनी सांगितले.
(शब्द संख्या २६५)
विद्यार्थी : शीतल आखाडे
विश्वकर्मा विद्यापीठ विकासवार्ता केंद्र) (विविवाके) ०५. ११. २०२०
संपादन : प्रा वैभव ठाकरे, डॉ किरण ठाकूर
More Stories
Breaking Barriers: The Journey of a Woman in Politics
Woman in Uniform
Women in Law: Megha Wagh’s Story of Perseverance and Progress Amidst Gender Challenges