मूळ लेखक: मनीषा स्वाइन, तृतीय वर्ष, बीएजेएमसी
अनुवादक: सिद्धी धर्माधिकारी, तृतीय वर्ष, बीएजेएमसी
१ मार्च, २०२२
असे म्हणतात की “स्वप्नांपासून यशापर्यंतचा मार्ग अस्तित्वात असतो, परंतु तो शोधण्याची दृष्टी, त्यावर जाण्याचे धैर्य आणि ते अनुसरण करण्यासाठी चिकाटी असणे आवश्यक आहे.”
माजी कॉर्पोरेट कर्मचारी असलेल्या गीतिका आनंदने आपल्या स्वप्नाकडे एक पाऊल पुढे टाकले आणि स्वतः चे “बुक कॅफे” उघडण्याचे तिचे स्वप्न पूर्ण करण्याचे धाडस केले. ‘किताबी चाय’ हे मार्व्हल संगरिया, NIBM रोड, कोंढवा, पुणे येथे तिसऱ्या मजल्यावर आहे. हे शहरातील लोकप्रिय बुक-कॅफे आहे. कॅफेमध्ये ५०० पेक्षा अधिक फिक्शन व नाॅन फिक्शन पुस्तकांचा संग्रह आहे.
कॅफेचे आतील सजावट आणि त्याला पूरक ठरलेलं वातावरण हे मन एकाग्र करण्यासाठी मदत करते. आणि त्यात पुस्तक, एक कप चहा आणि विंडो सीट…..आता सुख म्हणजे नक्की अजून तरी काय असतं?
गीतिका आनंद, संस्थापक, किताबी चाय आपला प्रवास सांगताना म्हणाल्या, “मी कॉर्पोरेट उद्योगात नऊ वर्षे काम केलं, पण मनात एक हुरहूर होती. मन सतत खायला उठायचं. एके दिवशी ‘गीतिका तुझं स्वप्न मागेच राहिल’ अशी स्वतः चीच हाक स्वतःला ऐकू आली आणि राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. तीन वर्ष झाली आहेत किताबी चाय बरोबर पण एकदाही मागे वळून बघण्याची इच्छा झाली नाही. “
बुक कॅफे सुरू करण्याच्या तिच्या प्रेरणेबद्दल बोलताना ती म्हणाली, “गेल्या पंधरा वर्षांपासून कॅफे उघडण्याचे माझे स्वप्न होते, म्हणून जेव्हा मी NIBM भागामध्ये शिफ्ट झाले तेव्हा माझ्या लक्षात आले की पुण्याच्या या भागात असं कॅफेच नाहिये जिथे लोक घरासारख्या वातावरणमध्ये काम करू शकतात. मी स्वतः अश्या जागांची फॅन आहे, त्यामुळे कळत-नकळत माझं हरवलेलं स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा झाली. आणि अशाप्रकारे किताबी चायची सुरुवात झाली.”
कॅफेमध्ये गीतिकाने पुस्तके विकण्यासोबत ती किरायाने देणेही सुरू केले आहे. ज्या ग्राहकांना पुस्तके किरायाने घ्यायची असतात त्यांना २ आठवड्यांचा कालावधीत पुस्तके परत करावी लागतील.
स्वप्न पाहिलं, ते पूर्ण करायची तयारी दाखवली आणि अखेर ते स्वप्न पूर्णत्वास आलं. पण हा प्रवास सोपा नव्हता. तिसर्या मजल्यावर कॅफे असल्यामुळे त्याचे तोटे होते. लोकांना कॅफे शोधणे खूप कठीण वाटले. कॅफेमध्ये गर्दी करणे शक्य नव्हते कारण जागेचा अभाव होता.
परंतु म्हणतात ना, ‘जेव्हा स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द असते तेव्हा ते स्वप्न पूर्ण होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही’, तसेच काहीतरी गीतिकाच्या बाबतीतही झाले. जरीही कॅफे तिसर्या मजल्यावर आहे तरीही लोकांनी सतत कॅफेला भेट द्यायला सुरुवात केली, गीतिका म्हणतात की मिळालेला प्रतिसाद हा सकारात्मक होता
पण लवकरच, COVID-19 मुळे, कॅफे बंद करावा लागला. पण कोरोना काळातही किताबी चाय मध्ये येण्यासाठी ग्राहक आधीपासून नोंदणी करून ठेवायचे.
गीतिका म्हणाल्या, “असे सहाय्यक ग्राहक मिळाल्याने मी किती धन्य आणि अभिमानास्पद आहे हे मी व्यक्त करू शकत नाही. लोक आधीच पुस्तकासाठी किंवा त्यांच्या येण्याची नोंदणी करून ठेवायचे कारण सोशल डिस्टन्सिंग पाळणे आम्हालाही गरजेचे होते.”
शिवाय याच लॉकडाऊनमध्ये किताबी चायने पुस्तके अख्या भारतात विकायला देखील सुरुवात केली आहे.
गीतिका सांगतात, “किताबी चाय हे ग्राहकांमुळे आज उभे आहे. तर हे आमचे ग्राहक आहेत जे किताबी चायच्या अस्तित्वाला कारणीभूत ठरतात. किताबी चाय ला भरभरून प्रेम देतात, माया देतात, आधार देतात.”
ते म्हणतात ना स्वप्न सगळेच पाहतात पण ते पूर्णत्वास आणणारे हे फारच कमी असतात. गीतिका आनंद ह्यांनी स्वप्नं पाहायचं धाडस तर केल पण ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःच सर्वस्वदेखील जोखून दिल! जेव्हा एखादी व्यक्ती स्वत:ची सर्वोत्तम आवृत्ती होण्यासाठी आव्हान देते तेव्हा काय होते याचे उदाहरण गीतिकाची कथा देते.
सिद्धी धर्माधिकारी
More Stories
Amidst the need of an inclusive environment, Pune gets a safe space for the LGBTQ+ community
A woman who dares to dream
Kadhi Khichadi: The Unique Speciality Of Parbhani