March 28, 2024

Vishwakarma University – Centre of Communication for Development

An Initiative of Department of Journalism and Mass Communication, Vishwakarma University, Pune

Covid 19 leads to luxury car damage in Mumbai as rodents chew its wiring: owner forced to disposed it off

By Correspondent

Pune, October  29, 2020 – Covid 19 has cost a Mumbai resident very dearly in an unexpected way. He had to dispose of his luxury car recently, only because rats and rodents chewed its wiring during the lockdown period!

He managed to drive his car with his family to Pune. It was a non-stop three hour journey without any event till they reached his destination by evening. The next day morning, he realized that he could not start the car. The mechanic announced that there was a short circuit of wiring inside the bonnet.  

Since March 2020 when the first lockdown was announced, his car was stationed at his car park at Mumbai’s Malad West, located along the suburban railway track.

The track has a swamp, grass, and filth that are a permeant abode of a colony of rats, rodents, reptiles and mosquito not visible to the residents. Like most residents of the area, it never struck him that any of these can create such a problem for his car.

Photo courtesy: www.cartersubaruballard.com

The auto-mechanic in Pune was not surprised. He said the rats – a swarm of them- can leave a trail of bread crumbs, other eatables; stink of their urine and excreta wherever you take the car.

Is it a once-in-a while incident or a serious perennial phenomenon? India data is not available, but it seems to be such a major cause of worry in USA that The Washington Post assigned its senior journalist to do a story published on Feb. 13, 2020 https://www.washingtonpost.com/science/2020/02/13/rats-will-devour-your-car/

The feature in its Science Section says ‘No one tracks rat damage to cars, but there are signs it is a growing problem (in the USA) amid a nationwide rat population boom. .. .. In recent years, a dozen class-action lawsuits have been filed against auto manufacturers on claims that today’s eco-friendlier wiring is irresistible to rodents.’

‘You take your car 20 to 30 years ago, they didn’t have that many wires,’ said a service fleet manager. ‘Now you have wiring for everything. There are so many different sensors and computers and modules.’

The Mumbai-based garage mechanic agreed when the car was towed back to Malad West last month. The owner had used the car for over nine years. He now realized that the company has already stopped its manufacture and its spares are not available in its service stations across India. About seven residents of the multi-storied building reported damage to their cars.

Only an enterprising auto mechanic with expertise in car’s electrical wiring would probably repair the wiring. He gave an estimate that was prohibitive and not worth trying. Instead, he preferred to book a new car for delivery during the coming Diwali!

उंदीर घुशींचा प्रताप..कारच्या वायरी केल्या फस्त 

पुणे, नोव्हेंबर २, २०२०. कोव्हीड १९ चा आणखी एक वेगळा फटका अनपेक्षित रित्या मुंबईच्या एका कार  मालकाला बसला. शेवरलेट क्रूज या लक्झरी कारच्या बॉनेट मधल्या सर्व वायरिंग उंदरांनी फस्त केल्या. एवढे नुकसान झाले की त्याला ती कार विकून टाकावी  लागली!

महामार्गावरील वाहतूक पुन्हा हळूहळू सुरु झाली, तेव्हा या  कार मालकाने धाडस करून ती कुटुंबियांसह स्वतः चालवत पुण्याला आणली.  मात्र दुसऱ्या दिवशी ती चालू होईना.  मेकॅनिकला बोलावलं  तेव्हा उंदीर घुशींनी बॉनेट मध्ये काय प्रताप करून ठेवला आहे हे कळलं.

मार्चमध्ये कॊव्हिड 19 मुळे देशातील सर्व व्यवहार ठप्प झाले, तेव्हा ही गाडी त्यानं आपल्या कार पार्क मध्ये ठेऊन दिली.  ती परत बाहेर काढायची वेळच आली नाही. 

परवा पुण्याच्या वर्कशॉपमध्ये ती आणली तेव्हा वायरिंग आणि संलग्न पार्ट दुरुस्त करण्याचा खटाटोप सुरू झाला पुणे, मुंबई, चेन्नई अशा सर्व सेंटर मध्ये ते मिळे ना.  कंपनीने गाडीची निर्मिती बंद करून   बराच काळ लोटला आहे. गाडीचे पार्ट आता कुठेच  मिळत नाहीत अशी माहिती मिळाली. 

एका जाणकार तंत्रकुशल मेकॅनिक ने प्रयत्न करून बघतो, पण वेळ लागेल असे सांगत  त्याने खर्चाचा अंदाज दिला. कार  नऊ वर्षांपूर्वी विकत घेतली, इतकी वर्ष वापरली, हे लक्षात घेता ती आता विकून टाकावी या निर्णयाप्रत मालक आला .

उंदीर, घुशी साप,शेवाळ आणि डास  आदींचे साम्राज्य

उंदराच्या प्रतापाचे या मेकॅनिकला आश्चर्य मात्र वाटले नाही.  रेल्वे ट्रॅक च्या शेजारी दलदल, गवत, ओला सुका कचरा, आणि गटारं  यामुळे उंदीर, घुशी साप,शेवाळ आणि डास  आदींचे साम्राज्य आहे. उंदीर घुशी बॉनेट मध्ये आणि डिकी मध्ये सहज शिरतात. त्यांचं अस्तित्व लक्षात येतच नाही. लांबच्या प्रवासात त्यांनी कुरतडून टाकलेले वायरिंग, पाव भाजी आदीचे तुकडे,  त्यांची विष्ठा-मूत्र आदी कारच्या खालच्या भागातून त्यांचा मार्ग ‘अधोरेखित’ करून जातात कारचे नुकसान होत राहते

‘वॉशिंग्टन पोस्ट’ या दैनिकाचा अभ्यास 

असे किती नुकसान होत असेल याची भारतात आकडेवारी उपलब्ध नाही. त्याचा एकत्रित पणे विचारही झालेला नाही. अमेरिकेतील प्रतिष्ठित ‘वॉशिंग्टन पोस्ट’ या दैनिकाने मात्र हा विषय मोठ्या गांभीर्याने घेतला. त्यावरचा लेख 23 फेब्रुवारी  २०२० रोजी  प्रसिद्ध केला (https://www.washingtonpost.com/science/2020/02/13/rats-will-devour-your-car/  त्यात त्यांनी या विषयाकडे जगाचं लक्ष वेधलं आहे देशातील हवामान आणि वातावरण उंदरांच्या वाढीसाठी  खूप पोषक आहे.  उंदीर घुशींना कार चे वायरिंग खायला आवडते. ते फस्त करतात.  त्यामुळे होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी अमेरिकन कोर्टात डझनभर दावेही दाखल झाले आहेत. कार निर्मात्यांच्या विरुद्ध हे दावे दाखल झाले आहेत. 

वीस- तीस वर्षांपूर्वी कार बनवत तेव्हा त्यांना एवढे सेन्सर्स आवश्यक नसत, पण आता इतके सेन्सर्स  आणि  इतकी संगणक यंत्रणा लागते, त्यामुळे वायरिंग देखील त्या पटीत वाढते. त्या वायरिंगची चव उंदीर घुशींना आवडते. त्यामुळे संधी मिळायची ते वाटच पाहत असतात, असं जाणकार म्हणतात असं या लेखात म्हटलं 

पुण्याहून मुंबईला कार मालकाने  टो करून गाडी परत नेली, तेव्हा तेथे ही दुरुस्तीचा अंदाज त्याने घेतला. आकडा ऐकून दुरुस्ती करण्यापेक्षा त्याच दर्जाची सेडान घेणं परवडेल असं मानून त्याने येत्या दिवाळीत नवी कार त्याने बुक केली आहे. 

Author: Prof Dr Kiran Thakur (kiran.thakur@vupune.ac.in)

Editor: Prof Vaibhav Thakare

Vishwakarma University Centre of Communication for Development