डॉ किरण ठाकूर
पुणे, विश्वकर्मा विद्यापीठ विकास वार्ता केंद्र (वि वि वि वार्ता केंद्र)
सुमारे चार दशका पूर्वी भारतावर आलेले मोठे संकट दूर होत आल्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत.
काँग्रेस गवत किंवा गाजर गवत अशा नावाने आलेलं हे संकट दूर करण्यासाठी उपयोगी ठरतो आहे एक सहा मिमी लांबीचा
क्षुद्र आणि निरुपद्रवी वाटणारा मूळचा मेक्सिकोचा भुंगा!
आपल्यावर मोठे उपकार करणाऱ्या या कीटकांची माहिती करून घेण्यापूर्वी हे काँग्रेस गवत आणि त्याच्यामुळे आलेले संकट
या विषयी जाणून घेऊ या. या तणाचे वनस्पती शास्त्रीय लॅटिन नाव .पार्थेनियम हिस्टेरिफोरस ( (Parthenium hysterophorus) असे आहे.
काँग्रेस गवत खाल्यामुळे गुरांच्या दुधाला कडवट चव येत असे. ्यंत वाढणारे हे गवत चवीने फारच कडवट असते .
लहान बालकांना अशा दुधाच्या सेवनामुळे इतर आजार होण्याची धास्ती होती.
या तणाचा देशातल्या शेतीला देखील मोठा धोका निर्माण झाला. सुमारे साडे तीन कोटी हेक्टर क्षेत्रावर या गवताने
आक्रमण केल्याने त्यावरची पिके नष्ट होऊ लागली होती .
भारतात आणि भारताबाहेर इंग्रजी वर्तमानपत्रानी तर या तणाला भयकारक नावं दिली होती. Scourge of India (भारतावर आलेलं अरिष्ट) हे त्यातलं एक. वर्ष १९८४ मध्ये हॉलिवूड चा ‘टर्मिनेटर’ या नावाचा चित्रपट जगभर गाजला होता.
मानव वंशाचा संहारच्या करू पाहणाऱ्यांचा निप्पात करणाऱ्या नायकाची ही कथा होती. विज्ञान कल्पित (Science fiction सायन्स फिक्शन ) असं स्वरूप असलेल्या या चित्रपटाचे नंतर आतापर्यंत सहा भाग (सिक्वील) निघाले.
टीव्ही आणि आता वेब सिरीअल सुरु आहेत. गेली छत्तीस वर्षे’ या टर्मिनेटर शब्दाने दहशत निर्माण केली. terminator आणि Scourge of India या इंग्रजी शब्दांना गुगल सर्च दिला की Parthenium hysterophorus (पार्थेनियम हिस्टेरिफोरस ) या संज्ञा वर आपण पोहोचतो.
काँग्रेस गवत किंवा गाजर गवत खेरीज वेगवेगळ्या भागात या तणाला वेगवेगळी नावं पडली होती. त्यातील एक होते चटकचांदणी. femine weed, dog flea, Santa Maria, bitter weed, carrot grass, false ragweed, fever few, white top, gajar ghas, अशी आणखी नवे.

काँग्रेस गवत किंवा गाजर गवत म्हणजे काय?
या गवतामुळे देश हताश झाला होता.
सत्तरच्या दशकात बेजार करून टाकणारा,
चेहरा – मान भेसूर करणारा, त्वचा रोग आणि दमा
अशा विकारांनी त्रस्त झालेले रुग्ण देशात मोठ्या संख्येनं
आढळण्याला कारणीभूत असलेले हे गवत होते.
चाऱ्याबरोबर पोटात गाजर गवत गुरांच्या पोटात गेल्यास
त्यांना आणि त्यांच्या दुधातून मानवाच्या पोटात गेल्यास
सर्वांनाच रोगांची बाधा होत असे.
लव्हाळयानंतर गाजर गवताचा त्रासदायक तणांमध्ये
क्रमांक लागेल. गाजर गवत भर उन्हाळ्यात धोतऱ्याबरोबर
(कणगुली) जिवंत रहाते. याच्या पांंढऱ्या बिया वाऱ्याबरोबर
आजूबाजूला पसरतात.
मुंग्यासुद्धा या बिया इकडेतिकडे पसरवतात.
तणाचा नायनाट करण्यासाठी मोठमोठ्या मोहीमा
अशा कुप्रसिद्ध तणाचा नायनाट करण्यासाठी मोठमोठ्या
मोहिमा हाती घेतल्या जात होत्या.
भारतात कृषी आणि वनस्पती शास्त्रज्ञ, त्वचा रोग डॉक्टर,
अशा अनेकांनी आघाडी उभारली. भारतात आणि देशाबाहेरही
स्वतंत्रपणे प्रयत्न सुरु झाले.
या मंथनातून भारतीय कृषी अनुसंधान परिषद आणि
तण संशोधन निदेशालाय यांनी मेक्सिको मधील
झायागींग्राम बायकोलाराटा या भुंग्यावर लक्ष केंद्रित केले.
मेक्सिको मधून आयात केलेल्या गव्हाबरोबर गाजर गवताचे
पार्थेनियम हिस्टेरोफोरसचे बी भारतात आले .
या प्रदेशात हे तण खाऊनच हा भुंगा जगतो आणि हे गवत
नष्ट होते हे लक्षात आल्याने या भुंग्यांची तेथून आयात करून
हा प्रयोग भारतात सुरु झाला.
केंद्र शासनाच्या ऑल इंडिया कोऑर्डिनटेड रीसर्च प्रोग्रॅमच्या माध्यमातून हा प्रयोग सुरु झाला. हळूहळू यश मिळत गेले तशी प्रयोगाची व्याप्ती वाढत गेली.
झायगोग्रामा
More Stories
Kadhi Khichadi: The Unique Speciality Of Parbhani
Women’s Day Special: The Last Bath
Women’s Day Special: The Queen challenged customs and traditions and enabled Saudi women to be educated